ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईसिटी अपडेट्स

वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात; टोलनाक्यावर उभ्या असलेल्या गाड्यांना भरधाव गाडीने उडवले, तिघांचा जागीच मृत्यू

Mumbai Accident | मुंबईतील (Mumbai) वांद्रे-वरळी सी लिंकवर (Bandra-Worli Sea Link) भीषण अपघात (Accident) झाला आहे. सी लिंकवरील टोलनाक्यावर (Toll Plaza) गाड्या रांगेत उभ्या होत्या. त्यावेळी मागून भरधाव वेगात आलेल्या गाडीनं सहा गाड्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

वांद्रे-वरळी सी लिंकवर रात्री 10.15च्या दरम्यान एका इनोव्हा कारनं टोल नाक्यावर उभ्या असलेल्या काही वाहनांना जोरदार धडक दिली. भरधाव वेगात आलेल्या इनोव्हानं आधी मर्सिडीजला धडक दिली, त्यानंतर एकामागे एक अशा सहा गाड्यांना धडक दिली. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत. हनिफ पिर, खतिजा हटिया आणि हमाबीबी पिर अशी मृत व्यक्तींची नावं आहेत.

या भीषण अपघातानंतर घटनास्थळी तातडीनं पाच रूग्णवाहिका दाखल झाल्या. त्यानंतर जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तसंच जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. तर आता पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

कार चालक होता पळून जाण्याच्या तयारीत

अपघातानंतर जखमी चालक घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याला पकडण्यात आलं. आता त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर त्याला अटक करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये