ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू

Pune Bangalore Accident | पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. कारची आणि टेम्पो धडक झाल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या मृतांमध्ये एका कोल्हापूर पोलिसाचा देखील समावेश आहे.

हा अपघात कऱ्हाड तालुक्यातील पाचवड फाटा येथे झाला. टेम्पो आणि कारची जोरात धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये एका महिलेचा आणि पोलिसाचा समावेश आहे. कोल्हापूर येथील राजवाडा पालीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर घटनेस्थळी एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये