आरोग्यइतरताज्या बातम्यान्युट्रीशियनपुणेमहाराष्ट्र

फेडरल बँक पुणे मॅरेथॉन मधून प्लास्टिक मुक्ततेचा संदेश 

पुणे :  फेडरल बँक पुणे मॅरेथॉनचे अत्यंत जोश पूर्ण वातावरणात संपन्न झाली. मॅरेथॉन धावपट्टू व फिटनेस आयकॉन मिलिंद सोमन या कार्यक्रमाचे ब्रँड ॲम्बेसेडर होते. संपूर्ण पंचक्रोशितील धावपट्टूंना एकत्र आणून या कार्यक्रमाने पुण्याच्या क्रीडा जगतात विशेष स्थान मिळविले आहे. पुण्याच्या कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये पराक्रमी धावपटूंनी विशेष उल्लेखनीय अशा धावांची नव्याने नोंद केली. शारीरिक स्वास्थ्याचे महत्व अधोरेखित करताना मॅरेथॉन च्या माध्यमातून प्लास्टिक मुक्त पाणी पुरवठा केंद्र व सार्वजनिक स्वच्छतालय उभारून या पर्यावरण सुरक्षेला देखील तितकेच महत्व देण्यात आले. या माध्यमातून प्लासिक मुक्तचा संदेशच त्यांनी दिला. 
भारताच्या केंद्रभूत स्पर्धा ठरणाऱ्या वार्षिक मॅरेथॉन मध्ये फुल मॅरेथॉन (४२.२ की.मी), हाफ मॅरेथॉन (२१.१ की.मी), १०,००० आणि ५००० फन रन यांच्या समावेश असतो. ज्या माध्यमातून विविध क्षमतेच्या व  वयोगटाच्या लोकांचा सामवेश होऊ शकतो.
उत्तम अशा वातावरणात सकाळी ५ वाजता हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथे सुरू झाला. पुण्याच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वतनवारसा व शहराच्या मुख्य खुणा स्पष्टपणे निदर्शनात येतील अशा पूर्व नियोजित पटावरून काहीशी आव्हानात्मक तसेच काहीशी गंमतशीर धाव आखण्यात आली होती.
मिलिंद सोमण यांनी फक्त ब्रँड एम्बेसडर म्हणूनच काम न पाहता खऱ्यार्थाने सर्व वयोगटातील लोकांना शारीरिक स्वास्थ्यासंबंधी प्रेरित केले व स्पर्धकांना देखील काही प्रश्न विचारून उत्साही ठेवले. तसेच त्यांच्या असण्याने या कार्यक्रमाचा मुख्य हेतू सामूहिक स्वास्थ्य आणि ऐक्टिव लिविंगला याला विशेष अर्थ प्राप्त झाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये