पुणे विद्यापीठाद्वारे विविध परीक्षांचे शुल्क निश्चित
विद्यापीठाने विविध विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी शुल्क निश्चिती केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यापीठातील विविध विभाग, संलग्न महाविद्यालयातील अभ्यासक्रम तसेच मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळेच्या नव्या अभ्यासक्रमांचे शुल्क जाहीर करण्यात आले आहे.
यासंदर्भात माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने विविध अभ्यासक्रमाच्या शुल्काबाबत शिफारस केली होती. त्यानुसार विद्यापीठातील विविध विभाग व संलग्न महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये नव्याने सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमाचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव्य विज्ञान विद्याशाखा आदी विद्याशाखेच्या अभ्यासक्रमाचे शुल्क जाहीर करण्यात आले आहे.
विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेशी संबंधित विनाअनुदानित एम.एसस्सी.कॉम्प्युटर सायन्स (विनाअनुदानित) अभ्यासक्रमाची शिक्षण शुल्क ४० हजार रुपये, तर या अभ्यासक्रमाची प्रयोगशाळा शुल्क ३५ हजार रुपये असणार आहे. मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन अर्थात एमसीए (विनाअनुदानित)अभ्यासक्रमाची शिक्षण शुल्क ५० हजार रुपये, तर प्रयोगशाळा शुल्क ३५ हजार रुपये असेल. नाशिक येथील उपकेंद्रात मधील बीबीए अभ्यासक्रमाचे शुल्क ३० हजार २५० रुपये तर प्रयोगशाळा शुल्क ५ हजार रुपये असेल.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विनाअनुदानित बी.एस्सी. काॅम्प्युटर अॅप्लिकेशन अभ्यासक्रमाचे शुल्क १६ हजार ९०० रुपये तर प्रयोगशाळा शुल्क १२ हजार ५०० असेल, बॅचलर ऑफ कॉमर्स इन बिझनेस मॅनेजमेंट बी.कॉम. अभ्यासक्रमाचे शुल्क १८ हजार ६०० , बॅचलर ऑफ कॉमर्स इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन बी.कॉम. अभ्यासक्रमाचे शुल्क १६ हजार ९०० रुपये आणि प्रयोगशाळा शुल्क १२ हजार ५०० असेल. बॅचलर ऑफ कॉमर्स इन इंटरनॅशनल बिजनेस बी.कॉम. अभ्यासक्रमाची शुल्क १८ हजार ६०० रुपये असेल, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.