नुकताच सोशल मीडियावर एका आजोबांचा डान्स तुफान व्हायरल होत आहे. त्या आजोबांनी ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांच्या चांदणी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्या डान्सला नेटकऱ्यानी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्यांचा हा व्हिडिओ भारतभर पसरत असल्याचं पाह्यला मिळत आहे. या डान्समधील तुफान डान्स करणाऱ्या आजोबांचं नाव विजय खरोटे असं आहे. तर त्यांनी त्यांचा हा डान्सचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवरती शेयर केला होता.
विजय खरोटे या आजोबांच्या ओ मेरी चांदनी या गाण्यावरील डान्सची पोस्ट करताना संबंधित व्हिडिओ क्रिएटरनं लिहिलं आहे की, आजोबांचा उत्साह हा तरुणांना लाजवणारा आहे. त्यांचा डान्सही कमालीचा आहे. तसंच या आजोबांनी याआधी देखील अनेक गाण्यावर डान्स केलले असल्याचं त्यांच्या इंस्टाग्रामवरती पाहायला मिळत आहेत. परंतु सध्या व्हायरल होत असणाऱ्या ओ मेरी चांदनी या गाण्यावरील डान्सला सर्वानी डोक्यावर घेतलं आहे तसंच त्यातील त्यांचा उत्साह, आणि लवचिकता तरुणमुलाला लाजवेल अशी आहे. यामुळे या व्हिडिओला हजारोच्या वरती व्ह्युज मिळाले आहेत. तर त्यांचे ८३.७ हजार फॉलोअर्स आहेत.
तसचं आजोबांच्या व्हिडिओ वरून अनेक लोकांनी कमेंट दिल्या आहेत. यात म्हटलं आहे की, जर कोणाला आनंदी राहायचं असेल तर त्या आजोबांकडून शिकायला हवं. आनंदी राहण्यासाठी कोणत्याच वयाची अट नसते. त्या आजोबांना खूप खूप शुभेच्या. अशा शब्दात कौतुक केलं जात आहे.