बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यासाठी व अत्याचारी नराधमास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी खा.सौ. सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
या प्रकरणात पोलिस यंत्रणेने गुन्हा नोंदवण्यात केलेली अक्षम्य दिरंगाई, भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असलेल्या संस्था चालकांची संशयास्पद भूमिका याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सरकारला जाब विचारण्यात आला.
खा.सौ. सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात कलाकार कट्टा, गुडलक चौक येथे झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे राजीनामा द्या, देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, अजित पवार राजीनामा द्या, महिला आयोग हाय हाय, महिलांना सुरक्षा द्या नराधमांना फाशी द्या अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी संपूर्ण डेक्कन परिसर दणाणून गेला होता.
या आंदोलनास आदरणीय खा.सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात पुणे शहरातील श्री. प्रशांत जगताप, स्वाती पोकळे, भारती शेवाळे, किशोर कांबळे,आशाताई साने, वेशाली थोपटे,मनाली भिलारे, पायल चव्हाण, अप्पा जाधव, ऋतुजा देशमुख,आसिफ शेख, राजश्री पाटील, पोपट खेडेकर, रोहन पायगुडे, मंगलताई पवार, रमीज सय्यद, दिलशाद शेख, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.