ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

पुण्यात दुचाकी विक्री दालनात भीषण आग, 20 ते 25 दुचाकी जळून खाक

पुणे | Pune Fire News – गेल्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune) आगीच्या (Fire) अनेक घटना घडताना दिसत आहेत. आताही आज (5 ऑक्टोबर) सकाळी पुण्यातील सिंहगड रोडवरील एका दुचाकी विक्री दालनामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 20 ते 25 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत ही आग आटोक्यात आणली.

सिंहगड रोडवरील नवशा मारूती मंदिराजवळ टीव्हीएस शोरूम दुचाकी विक्री दालनामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग एवढी भडकली होती की यामध्ये दालनातील 20-25 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तसंच ही आग नेमकं कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान, दुचाकी विक्री दालनाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये