ताज्या बातम्यामनोरंजन

मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरवर येणार सिनेमा

मुंबई | सुकेश चंद्रशेखर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) आता तुरुंगात आहे. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांचीही नावे आहेत. अशातच मनोरंजन विश्वातून एक मोठे वृत्त समोर आले आहे. बॉलिवूड आरोपी सुकेश चंद्रशेखरवर चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. आनंद कुमार या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. चित्रपट निर्मितीसाठी अधिक माहिती गोळा करण्यासाठी आनंद कुमारही तुरुंगात पोहोचले होते. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी तुरुंग अधिकाऱ्यांकडून सुकेशची संपूर्ण कहाणीही जाणून घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशच्या आयुष्यावर आधारित संपूर्ण कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. यामध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते मनी लाँड्रिंगपर्यंत सर्वकाही दाखवले जाणार आहे. कशाप्रकारे त्याने श्रीमंत लोकांची फसवणूक केली आहे. इतकेच नाही तर ज्या अभिनेत्रींसोबत सुकेशचे नाते होते त्यांचा उल्लेख या चित्रपटात करण्यात येणार आहे. या चित्रपटात जॅकलिन आणि नोरा फतेही यांचीही महत्त्वाचे पात्र असू शकते कारण सुकेशच्या आयुष्यात दोन्ही अभिनेत्रींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी सुकेश-जॅकलिनच्या प्रेमकथेवर वेब सीरिज बनवल्याची बातमीही समोर आली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये