ताज्या बातम्यादेश - विदेश

“अपघातादरम्यान एअरबॅग उघडलीच नाही, त्यामुळे…”, आनंद महिंद्रांविरोधात FIR दाखल; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Anand Mahindra | महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्यावर FIR दाखल करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील कानपुरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं आनंद महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या 13 कर्मचाऱ्यांवर एफआयआर दाखल केला होता. आनंद महिंद्रा आणि त्यांची कंपनी आपल्या मुलाच्या अपघाताला जबाबदार असल्याचा आरोप या व्यक्तीनं केला आहे.

आनंद महिंद्रा आणि त्यांच्या कंपनीच्या विरोधात एफआयआर दाखल केलेल्या व्यक्तीचं म्हणणं आहे की, त्यानं त्याच्या मुलाला महिंद्रा स्कॉर्पिओ कार भेट दिली होती. तर 2022 मध्ये त्यांच्या मुलाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी आनंद महिंद्रा आणि त्यांच्या कंपनीच्या इतर 12 कर्मचाऱ्यांनी आपली फसवणुक केल्याचा आरोप या व्यक्तीनं केला आहे. याबाबत महिंद्रा कंपनीकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपुरमधील राजेश मिश्रा या व्यक्तीनं महिंद्रांविरोधात तक्रार दाखल केली आहे. राजेश यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, त्यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा अपूर्व मिश्राला स्कॉर्पिओ कार भेट दिली होती. तर 14 जानेवारी 2022 रोजी अपूर्व त्याच्या मित्रांसह स्कॉर्पिओमधून लखनौहून कानपूरला येत होता. त्यावेळी धुक्यामुळे त्यांची कार दुभाजकावर जोरात आदळली आणि अपघातात अपूर्वचा मृत्यू झाला.

तर तक्रारदार राजेश यांनी उत्तर प्रदेशातील तिरूपती ऑटोमोबाईल्समधून एसयूव्ही कार खरेदी केली होती. मुलगा अपूर्वच्या अपघातानंतर 29 जानेवारी 2022 रोजी एसयूव्ही घेऊन ते शोरूममध्ये पोहोचले. त्यावेळी त्यांनी कंपनीला गाडीमधील काही प्रॉब्लेम्स सांगितले. तसंच आमच्या मुलानं सीट बेल्ट लावला होता तरीही गाडीत एअरबॅग डिप्लॉय झाल्या नाही. त्यामुळे मुलाचा मृत्यू झाला, असा आरोप राजेश यांनी केला. तसंच त्यांनी शोरूमवाल्यांना काही प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी कंपनीवर फसवणूक करून कार विकल्याचा आरोप देखील केला. जर तुम्ही कारची नीट तपासणी केली असती तर आमच्या मुलाचा मृत्यू झाला नसता असंही राजेश यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणावर महिंद्रा कंपनीनं प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीनं म्हटलं आहे की, 2020 मध्ये उत्पादित केलेल्या Scorpio S9 या कारमध्ये एअरबॅग्ज होत्या. तसंच या प्रकरणाची चौकशी महिंद्रा अँड महिंद्रानं कंपनीनं केली असून एअरबॅगमध्ये कोणताही दोष आढळलेला नाहीये.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये