पुण्यात चाललंय काय? शिल्लक वादातून कात्रजमध्ये गोळीबार
कात्रज | पुण्यात मागील काही दिवसांपासून हत्येची मालिका सुरुच आहे. शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चालल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान कात्रज परिसरात बुधवारी रात्री क्रिकेट खेळण्याच्या वादातून गोळीबार करण्यात आला असून यात दोघे जण जखमी झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथे काल क्रिकेट सामने सुरू होते. दोन गटात सामने सुरू असतांना अचानक क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला. दरम्यान, हा वाद सोडवण्यासाठी दोन्ही गटाचे काही तरुण पुन्हा बुधवारी भेटले. दरम्यान, यातील एका गटातील उमेदवार हा रेकॉर्ड वरील अट्टल गुन्हेगार होता. वाद मिटवत असतांना पुन्हा वाद वाद झाला.
हा वाद विकोपाला गेल्याने तरुणांमध्ये भांडणे झाली. यावेळी एका तरुणाने समोरच्या गटात असणाऱ्या तरुणावर बंदूक ताणत गोळीबार केला. यात दोघे जण जखमी झाले. दरम्यान, या ठिकाणी गोंधळ उडाला. येथे जमलेले तरुण जिवाच्या आकांताने पळून गेले. तर दोन जखमी तरुणांना त्याच्या मित्रांनी दवाखान्यात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून काही जणांना अटक करण्यात आली आहे.