गोव्यातही ऑपरेशन लोटस? कॉंग्रेसचे पाच आमदार राज्याबाहेर रवाना!

महराष्ट्रातील शिवसेनेची स्थिती पाहून अनेक राज्यांतील सरकारांना आपल्या आमदारांबाबत तेही बंड करतील की काय अशी भीती भरली असल्याचं दिसत आहे.भाजपच्या ऑपरेशन लोटसने महाराष्ट्रात चांगलंच यश मिळवलं आहे. त्यामुळे इतर राज्यांतील भाजप विरोधी सरकार सावध झाली आहेत. गोव्यात आमदार फुटण्याच्या भीतीने गोवा कॉंग्रेसने आपले पाच आमदार चेन्नईला पाठवले असल्याची माहिती आहे.
गोव्यातील कॉंग्रेसच्या आमदार बाहेर पाठवण्याच्या घटनेने राजकीय वातावरणात खळबळ सुरु झाल्याचं दिसत आहे. मागील काही दिवसांपासून गोव्यातील कॉंग्रेसचे आमदार भाजपला समर्थन करत असल्याची चर्चा सुरु होती. आमदार मायकेल लोबो हे काही आमदारांसह बंडखोरी करणार असून भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा होती.
कॉंग्रेसच्या आमदारांना बाहेर पाठवल्याने भाजपचे गोव्यातही ऑपरेशन लोटस सुरु केले आहे की काय अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान, कॉंग्रेस आमदार मायकल लोबो यांनी आमदार बंडखोरी करत असल्याच्या वृत्ताचे खंडन केलं आहे. त्याचबरोबर भाजप अवर्जुन अफवा पसरवण्याचं काम केलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.