पुण्यात शिवसेनेला मोठं खिंडार?

पुणे : (Pune Five councilors will join Shinde group) राज्यातील विधानपरिषदेच्या निकालानंतर राजकारणाला वेगळेच वळण लागले. एकनाथ शिंदे सेनेसोबत बंडखोरी केली आणि आपल्या सोबत ५० आमदार घेऊन वेगळा गट स्थापना केला. भाजपच्या मदतीनं शिंदे गटानं गुरुवार दि. ३० जुन रोजी सरकार स्थापन केलं. यामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि सेना नेते एकनाथ शिंदेंनी राज्याचे नवी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
दरम्यान, शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर उद्बवलेल्या राजकीय स्थितीत त्यांच्या पाठिशी पुण्यातील शिवसेनेची ताकद किती होती हे स्पष्ट होऊ शकलं नव्हतं. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच पुण्यातील जवळचे असलेले हडपसर भागातील शिवसेनेचे जेष्ठ माजी नगरसेवक नाना भानगिरे यांना शिंदे गटातून थेट मुंबईत पाचारण करण्यात आले आहे.
मात्र, आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे यांच्यासह ५ नगरसेवक एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी नाना भानगिरे यांच्याकडे देण्यात येणार आहे. भानगिरे यांनी हडपसर विधानसभा निवडणूक तीन वेळा लढवली होती.