चटपटीत फास्टफूडसाठी…वेला’ज कॅफे

कोणतंही कॅफे हे तिथल्या पदार्थांसोबतच त्या कॅफेची रचना, त्यांनी केलेली डिझायनिंग यामुळे आजकालची तरुणाई त्या कॅफेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसते. तसेच पिझ्झा, कोल्ड कॉफी म्हटलं की लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण हौसेने एखाद्या प्रसिद्ध कॅफेत जाऊन पदार्थांचा आस्वाद घेत असतात. अशाच फास्टफूड प्रेमींसाठी वेला’ज कॅफे प्रसिद्ध आहे. वेला’ज कॅफे हे मिलिंद महाले यांचं कॅफे आहे.
वेला’ज कॅफे हे अगदी कमी काळात खवय्यांच्या पसंतीस उतरणारे कॅफे ठरले आहे. कारण या कॅफेचे आदरातिथ्य, तसेच त्यांचे पदार्थ सर्वसामान्यांपासून प्रत्येकाच्याच खिशाला परवडतील याच दरात मिळतात त्यामुळेच या कॅफेत खवय्ये नेहमी गर्दी करताना दिसतात. वेला’ज कॅफेची पास्ता, बॉइल्ड एग, चिकन सॅण्डवीच, पनीर तंदुर पिझ्झा, मॉकटेल, ब्राउनी, कोल्ड चॅाकलेट, हॅाट चॅाकलेट, थिक कॅाल्ड कॉफी, कोल्ड कॉफी विथ क्रश, व्हेज बर्गर, फ्रेंच फ्राईज, पेरी पेरी फ्राईज असे अनेक पदार्थ त्यांची खासियत आहेत.
वेला’ज कॅफेने फक्त पुण्यातीलच नाही तर बाहेरील ठिकाणांहून येणाऱ्या खवय्यांमध्ये देखील आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वेला’ज कॅफे म्हटले की, तरुणाईची पावले आपोआपच त्याकडे खेचली जातात. तसेच या कॅफेत बर्थडे पार्टी उत्तम डेकोरेशनसह ॲरेंज केली जाते. त्यामुळे कॅफेकडे तरुणाईचा ओढा मोठ्या प्रमाणात असतो. तर तुम्हालाही पार्टी करायची असेल, स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की वेला’ज कॅफेला भेट द्या.