ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांचा बुलंद आवाज काळाच्या पडद्याआड, माजी आमदार गुलाबराव पाटील यांचं निधन

जळगाव | Gulabrao Patil Passed Away – अमळनेरचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील (Gulabrao Patil) यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. तसंच आज (23 ऑगस्ट) अमळनेर तालुक्यातील दहिवद गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

गुलाबराव पाटील हे पुलोद सरकारच्या काळात अमळनेर मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले होते. ते तीन वेळा आमदार राहिले आहेत. तसंच शेतकऱ्यांचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख होती. जिल्ह्यात त्यांची शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे आमदार म्हणून ओळख होती.

गुलाबराव पाटील यांच्या निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांच्या निधनानं सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा, त्यासाठी विधानसभेत उठणारा बुलंद आवाज हरपला आहे. राजकारणापलीकडे मैत्री जपणारं एक मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये