ताज्या बातम्यारणधुमाळी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीचे समन्स, 5 जुलैला हजर राहण्याचे निर्देश

मुंबई | Sanjay Pandey – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यांना 5 जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच संजय पांडे हे 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर मुंबईच्या आयुक्तपदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय पांडे यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला होता. तसेच NSE सर्वर कंप्रमाइज केस प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती, ही कंपनी संजय पांडे यांची होती. या दोन्ही प्रकरणी संजय पांडे यांना ईडीने नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकणात संजय पांडे यांच्यावर ईडी कारवाई करु शकते, असं म्हटले जातंय.

दरम्यान, संजय पांडे यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर असताना त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे, त्याचबरोबर त्यांच्यावर बऱ्याचवेळा वेगवेगळे आरोप करण्यात आले होते. त्याच आरोपाखाली त्यांना समन्स पाठवल्याची माहिती आहे.  

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये