World Cup 2023: वर्ल्ड कप सुरू असताना पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या प्रिय व्यक्तीचं निधन
World Cup 2023 | सध्या वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) सुरू आहे. एकिकडे वर्ल्ड कप सुरू असतानाच दुसरीकडे पाकिस्तानच्या (Pakistan) एका दिग्गड खेळाडूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दिग्गज खेळाडूच्या जवळच्या प्रिय व्यक्तीचं निधन झालं आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या (Shahid Afridi) बहिणीचं निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच शाहिद आफ्रिदीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यानं त्याची बहिण आजारी असल्याचं सांगितलं होतं. तसंच तिच्यावर रूग्णालयात उपचार देखील सुरू होते. पण आज (17 ऑक्टोबर) तिन अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे शाहिदवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
16 ऑक्टोबरला शाहिद आफ्रिदीनं एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनं बहिणीचा हात हातात धरल्याचा एक फोटो शेअर केला होता. तसंच हा फोटो शेअर करत आपली बहिण आजारी असल्याची माहिती त्यानं सर्वांना दिली होती. पण दुसऱ्या दिवशी आफ्रिदीनं ट्विट करत बहिणीच्या निधनाबाबत सांगितलं.