देश - विदेश

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

चंदिगढ : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ते शिरोमणी अकाली दलाचे सरदार आहेत. या आठवड्याभरात तब्बेत ठीक नसल्यामुळे दोन वेळा मोहाली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच शिरोमणी अकाली दल प्रवक्त्याने सांगितले की, त्यांच्या छातीत दुखत असल्याने आणि रात्री त्यांच्या उलट्या झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

तसंच फेब्रुवारी महिन्यात प्रकाश सिंग बादल यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.त्यानंतर त्यांच्यावर कोविड च्या तपासणी करण्यात आल्या होत्या. उपचारानंतर ते पूर्णपणे बरे झाले होते. परंतु ६ जून ला प्रकाश सिंग बादल यांना गॅस्ट्रिकच्या समस्येमुळे चंदीगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची तब्बेत स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

प्रकाश सिंग बादल यांचा पंजाबच्या राजकारणात मोलाचा वाटा आहे. ते पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी १९४७ ला राजकारणात प्रवेश केला. सुरवातीला १९५७ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक जिंकली. तसंच त्यांनी पंचायत राज, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मंत्रालयांमध्ये कार्यकारी मंत्री म्हणून देखील काम केलं आहे. याचबरोबर १९७० ते १९७१ , १९७७ ते १९८०, १९९७ते २००२ आणि २००७ ते २०१७ या कालावधीतपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा कारभार प्रकाश सिंग बादल यांनी पंजाबमध्ये चोख सांभाळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये