तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री KCR बाथरूममध्ये पाय घसरून पडले, तातडीनं रूग्णालयात दाखल
हैदराबाद | Telangana Former CM KCR : तेलंगणाचे (Telangana) माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Chandrashekar Rao) हे बाथरूममध्ये पाय घरून पडले. त्यामुळे त्यांना तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच त्यांच्यावर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया पार पडणार आहे. केसीआर (KCR) यांना हैदराबादमधील (Hyderabad) यशोदा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
केसीआर काल रात्री एररावल्ली येथील त्यांच्या फार्महाऊसमधील बाथरूममध्ये पाय घरून पडले. त्यानंतर त्यांना तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तर आता त्यांच्यावर हिप रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया पार पडणार आहे.
केसीआर यांच्या दुखापतीबाबत त्यांच्या मुलीनं ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, बीआरएस सुप्रीमो केसीआर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यामुळे ते सध्या रूग्णालयात तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आहेत. तसंच तुमच्या पाठिंब्यामुळे आणि शुभेच्छांमुळे वडील लवकरच बरे होतील. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.
दरम्यान, 3 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात तेलंगणामध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं 64 जागा जिंकल्या तर बीआरएसनं 39 जागा जिंकल्या. त्यामुळे केसीआर यांची मुख्यमंत्री बनण्याची हॅटट्रिक हुकली.