ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणपती मंदिराजवळ रिक्षावर झाड कोसळून चौघे जखमी

पुणे | Pune News – कोथरुडमधील (Kothrud) कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणपती मंदिराजवळ एका रिक्षावर झाड कोसळल्याने त्यात तिघे जण जखमी झाले. सुदैवाने रिक्षातील तिघांना किरकोळ जखमा झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढून ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. ही घटना सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी घडली.

याबाबत अग्निशामक दलाकडून दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड येथील दशभुजा मंदिराजवळील कॅनॉल रोडवरुन रिक्षा जात होती. त्याचवेळी एक गुलमोहराचे झाड उन्मळून रिक्षावर पडले. त्याचवेळी तेथून एक दुचाकीही जात होती. दुचाकी चालक सुदैवाने वाचला. झाड रिक्षावर पडल्याने त्यातील प्रवासी आत अडकले होते.

दशभुजा गणपती जवळचे ट्रॅफिक पोलीस गणेश शिंदे आणि कृष्णा ओंबळे यांनी त्वरित जखमींना रिक्षांमधून बाहेर काढून त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन झाडाच्या फांद्या बाजूला करुन आतील प्रवाशांची सुटका केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये