“युती तुटली तरी दोस्ती नाय”; विशाखा सुभेदारची पोस्ट चर्चेत!

मुंबई – कॉमेडी म्हटलं ही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू येतच. गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या ‘शो’ ने अक्षरशः महाराष्ट्रालाच नव्हे संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. त्या शोमधील अभिनय सादर करणारे आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारे कलाकार म्हणजेच सर्व हास्यरथी आहेत. त्याच शोमधील सर्वांची आवडती जोडी म्हणजे ‘समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार’. गेल्या काही महिन्यांपूर्वी विशाखाने हा शो सोडला आहे. तरीही आपल्या हास्यजत्राच्या सहकलाकारांशी संपर्क मात्र आहे. आपल्या विनोदाने ‘या’ जोडीने मंचावर अनेकांच्या डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसवल आहे. आज विशाखा सुभेदार ने आपला मित्र समीर चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त काही फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
विशाखा सुभेदार म्हणते की, ‘सम्या… वेड्या माणसा.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. ह्या गेल्या काही वर्षांत आपण एकत्र काम करत असताना, तुझ्याकडून खूप ऊर्जा मिळाली, प्रेसेन्स ऑफ माइंड, इन्स्टंट ह्या सारख्या अनेक गोष्टी शिकले. खूप काही शेयर केलंय. आपण एका मंचावर अनेक वर्ष काम केल आहे..! तू उत्तम हाडाचा कलाकार आहेस मित्रा. तुझ्यातला लेखक दिवसेंदिवस स्फूरत चालला आहे..!असं तिने आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे. तसंच तिने समीरच कौतुक देखील करत त्याला शुभेच्या दिल्या आहेत.’आत्ता तुला मागे वळून बघायची गरज नाही. आनंदात, सुखात रहा, कारण उभ्या महाराष्ट्राला तुला आनंदात ठेवायचं आहे.. सगळ्यांनच्या गळ्यातला ताईत झाला आहेस तू..! आपल्या जोडीने खूप छान- छान प्रसंग अनुभवले आहेत. आपण भांडलो, रुसलो, हट्टी वागलो, हिरमूसलो, हसलो, मस्ती केली, खोड्य काढल्या आणि प्रेमही तितकेच टॉम अँड जेरी सारखं… सम्या जे जे तुला हवं ते ते तू मिळवतोच.. त्यामुळे ते तुला मिळेलच, असं देखील विशाखा म्हणाली आहे.
दरम्यान, विशाखाने तिच्या हटके कॉमेडी अंदाजात समीरला म्हटलं आहे की, ‘तेरा हो गया रे… तू जीत गया रे… मनापासून शुभेच्छा.. सम्या.. love u दोस्ता.. युती तुटली तरी दोस्ती नाय..’ अशा शब्दात तिने समीरला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. समीर चौगुले आणि विशाखा यांची जोडी कायमच प्रेक्षकांना कॉमेडीने, अभिनयाने भुरळ घालणारी होती. विशाखा कायमच समीरबद्दल आणि त्याच्या अभिनयाबद्दल भरभरून बोलत असते आजही तिने त्यांच्या मैत्रीच्या नात्याबद्दल हटके शुभेच्या दिल्या आहेत.