ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्र

फुरसुंगी अन् उरुळी देवाची महापालिकेतून वगळली; आता मिळणार ‘हा’ दर्जा

पुणे : (Fursungi and Uruli Devachi excluded from PMC) फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावं पुणे महापालिकेतून वगळ्यात यावीत अशी मागणी बऱ्याच काळापासून होत होती. ती मागणी आता पुर्णत्वास आली असून ही दोन्ही गावं महापालिकेतून वगळण्यात आली असून त्यांची नगर परिषद होणार आहे. याबाबतचा आदेश सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे.

फुरसुंगी आणि उरळी देवाची या गावांची मिळून आता नगर परिषद होणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यासाठी पुणे महानगरपालिकेतून ही दोन्ही गाव वगळण्यात आली आहेत. राज्य सरकारकडून याबाबत नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर माजी आमदार विजय शिवतारे यांनी या दोन्ही गावांची नगरपरिषद करण्याची मागणी केली होती.

याबाबत पुणे महानगरपालिकेने राज्य सरकारला सविस्तर प्रस्ताव पाठवला होता. यावर विचार करून राज्य सरकारनं आज नवीन आदेश काढून फुरसुंगी आणि उरळी देवाची या नवीन नगर परिषद असतील असे जाहीर केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये