चीनच्या आर्थिक वर्चस्वाला तडा? जी-20 परिषदेमुळे भारताला मोठी संधी, ‘या’ व्यापारासाठी दरवाजे खुले..

G-20 Summit New Delhi : अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि G-20 सभासद राष्ट्रांनी शनिवारी दि. ९ सप्टेंबर रोजी शिपिंग कॉरिडॉर तयार करण्याच्या योजनांवर चर्चा केली. हा कॉरिडॉर भारताला मध्य पूर्व आणि युरोपशी जोडेल. हा शिपिंग कॉरिडॉर जागतिक व्यापारासाठी गेम चेंजर ठरू शकतो. इंडो-पॅसिफिक धोरणाचे वरिष्ठ अमेरिकन अधिकारी कर्ट कॅम्पबेल यांनी चर्चेनंतर माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष बिडेन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात शुक्रवारी सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेत पायाभूत सुविधा आणि दळणवळणाशी संबंधित महत्त्वाच्या उपलब्धींचा देखील समावेश होता. ते भारताला पश्चिम आशिया आणि युरोपशी जोडेल.
व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियाला जोडणारा बहुराष्ट्रीय रेल्वे आणि बंदर करार शनिवारी नवी दिल्लीत होणाऱ्या G-20 परिषदेच्या वेळी जाहीर केला जाईल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका, सौदी अरेबिया, युरोपियन युनियन, यूएई आणि इतर युरोप आणि भारत यांच्यातील व्यापार वाढवण्यासाठी करार करतील. हा करार मैलाचा दगड कसा ठरणार आहे.