ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मनसे नेत्याची जीभ घसरली, सुषमा अंधारेंचा उल्लेख केला ‘काळी मांजर’

मुंबई | Sushama Andhare – राज्याच्या राजकारणात नेतेमंडळी नेहमी एकमेकांवर टीका करताना दिसतात. मात्र, काहीवेळा टीका करताना नेतेमंडळींची जीभ घसरतानाही दिसते. मग यामध्ये नेते महिलांवरती देखील खालच्या स्तरावर जाऊन टीका करतात. तसंच आत मनसेचे (MNS) प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांची जीभ घसरली आहे. त्यांनी शिवसेनेच्या (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांचा ‘काळी मांजर’ म्हणून उल्लेख केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

गजानन काळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि सुषमा अंधारे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी गजानन काळेंनी सुषमा अंधारेंचा उल्लेख काळी मांजर करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यामुळे आता शिवसेना आणि मनसे यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

काळी मांजर सारखी आडवी जाते. शरद पवार (Sharad Pawar) यांनी टीका करण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ठेवले होते. मात्र, आता त्यांना शांत बसवून हे पार्सल राष्ट्रवादीतून ठाकरे गटाकडे का पाठवलं आहे, अशी खोचक टीका काळेंनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, संजय राऊत असो किंवा सुषमा अंधारे असो आता हा पक्ष संपणारच आहे. या पक्षात आता उरलेसुरले दोघं बापलेकच राहणार असल्याचं दिसून येणार आहे. तसंच आदित्य ठाकरेंनी आपल्या घराचा परिसर सोडून वरळीतून निवडणूक का लढवली आहे, असा सवालही गजानन काळेंनी आदित्य ठाकरेंना विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये