ताज्या बातम्यापुणे

“वी सपोर्ट पुनीत बालन”… असं म्हणत पुनित बालन यांना पाठिंबा देण्यासाठी गणेश मंडळं एकत्र!

पुणे | गणेशोत्सवाच्या काळात उद्योजक पुनित बालन (Punit Balan) यांच्या मोठ्या प्रमाणात झळकणाऱ्या होर्डिग्जची चर्चा होती. मात्र याच फ्लेक्स आणि फोटोंना अनधिकृत ठरवून महापालिकेने त्यांना 3 कोटी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बालन यांनी पुण्यातील गणेश मंडळांना प्रचंड प्रमाणात देणग्या दिल्याने गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात पुनित बालन आणि त्यांच्या मिनरल वॉटर ब्रॅण्डचे संपूर्ण शहरात फ्लेक्स लावण्यात आले होते. याच गणेश मंडळांनी आता पालिकेच्या या निर्णयाच्या विरोधात आज पुणे महानगरपालिकेला निवेदन दिले आहे. पुनीत बालन यांनी आर्थिक मदत केल्याने गणेशोत्सव इतक्या सहजतेने पार पडला आणि आम्ही देखील त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत, अशी भूमिका गणेश मंडळांनी घेतली आहे.

पुनित बालन यांनी आम्हा सर्वांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आर्थिक मदत केली. ती मदत केल्यामुळे बालन यांना पुणे महानगर पालिकेने शिक्षा दिली. याचा निषेध करण्यासाठी आम्ही गणेशमंडळांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र यायचं ठरवलं आहे आणि हा दंड माफ करावा, अशी विनंती महापालिकेकडे निवेदन दिलं आहे, शांततामय मार्गाने महापालिकेत एकत्र आलो असल्याचं गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.

गणेश मंडळं एकत्र येऊ आणि पुढची योग्य पावलं टाकू…

पुण्यातील गणेशोत्सवाला (Pune Ganesh Festival) मोठी परंपरा आहे. देशात नाही तर जगात पुण्यातील गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. त्यांनाच साथ देणाऱ्यावर अशी परिस्थिती येत असेल तर हे चुकीचं धोरण आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही सगळे गणेश मंडळं एकत्र येऊ आणि पुढची योग्य पावलं टाकू, असाही इशाराही त्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये