पुनावळे कचरा डेपोचे गाडे अडकले
सात वर्षांपासून प्रकल्प पुढे सरकेना
पिंपरी : पुनावळे कचरा डेपोसाठी आवश्यक जागेचा ताबा न मिळाल्याने येथील कचरा डेपोचे गाडे पुढे सरकलेले नाही. गेल्या सात वर्षांपूर्वी राज्य सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. मात्र, सात वर्षांचा काळ उलटल्यानंतरही हा प्रकल्प पुढे सरकलेला नाही. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या २५ लाखांवर जाऊन पोहचली आहे. दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत मोशी येथील कचरा डेपो अपुरा पडणार आहे. त्यामुळे पुनावळे येथील कचरा डेपोची जागा ताब्यात घेऊन तेथे कचरा डेपो सुरू केल्यास शहराची भविष्यातील कचरा समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प महत्त्वाचा-
शहरामध्ये सध्या दररोज १००० ते १०५० टन इतका घनकचरा निर्माण होतो. मोशी येथील कचरा डेपोमध्ये सध्या या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. येथील कचरा डेपोमध्ये यांत्रिकी खतनिर्मिती प्रकल्पात ५०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती प्रकल्पात ५ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. तर, मटेरियल रिकव्हरी सुविधेमध्ये एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची सुविधा आहे. त्याशिवाय, कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. त्या माध्यमातून ७०० टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊ शकणार आहे. त्यामुळे कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
पुनावळे कचरा डेपोसाठी हव्या असलेल्या जागेच्या मोबदल्यात वन विभागाला पर्यायी जागा द्यावी लागणार आहे. अशी पर्यायी जागा सुचविण्याबाबत महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून विचारणा केली आहे. तसेच, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य वनसंरक्षक यांची एकत्रित बैठक लावण्याची देखील मागणी केली आहे.
-प्रसाद गायकवाड,
उपसंचालक, नगररचना विभाग, महापालिका
समस्या- शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता मोशीतील कचरा डेपो अपुरा पडणार पर्यायी कचरा डेपो न मिळाल्यास कचरा निर्मूलनाची समस्या गंभीर होत जाणार.
उपाययोजना- मोशी कचरा डेपोला पर्याय म्हणून पुनावळे कचरा डेपो सुरू होणे गरजेचे पुनावळेतील कचरा डेपोला जागेचा ताबा मिळविण्यासाठी महापालिकेकडून ठोस प्रयत्न हवे.
पुनावळे कचरा डेपोसाठी जागा कधी?
पुनावळे कचरा डेपोसाठी आरक्षित असलेली २२.८० हेक्टर इतकी जागा वन विभागाच्या ताब्यात आहे. तर, खासगी ३ हेक्टर जागेवर देखील हे आरक्षण आहे. पुनावळेतील जागेच्या मोबदल्यात वन विभागाने पर्यायी जागेची मागणी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार त्यांना पिंपरीतील जागा सुचविण्यात आली. ही जागा स्वीकारण्यास ते सुरुवातीला तयार झाले होते. मात्र, त्यांनी ही जागा