पुणे

गृहिणींचे बजेट कोलमडले; फोडणीतला लसूण गेला ६०० पार

गृहीणींच्या डोळयात अक्षरश: पाणी आणले आहे’ लसणाची ‘फोडणी’ ला विक्रमी भाव आला असून तब्बल ६०० रुपये किलो दराने लसूण मिळत आहे. त्यामुळे काही किचनमध्ये तर लसूण गायबच झाला असून गृहिणींचे बजेटमधील कोलमडले आहे.

अन्नपदार्थांना चव येण्यासाठी कांद्याबरोबरच प्रामुख्याने वापरला जाणारा घटक म्हणून लसणाचा वापर केला जातो. मात्र सध्याचे लसणाचे दर पाहता ‘फोडणीत लसूण घालायचा की नाही’ असा प्रश्न गृहिणींसमोर निर्माण झाला आहे. सध्या दैनंदिन वापरातील अविभाज्य घटक असलेल्या हळद, आलं, मिरची, जिरं यासारख्या गोष्टींचे दरही गगनाला भिडले आहेत.

अतिवृष्टीमुळे यंदा बाजारामध्ये लसणाची आवक कमी झाली आहे. त्यामुळेच पुढील काही महिन्यांसाठी लसूण चढ्या दराने विकला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही महिन्यांपासून सुरु असलेली लसणाच्या दरामधील ही वाढ अजून किमान दोन ते तीन महिने कायम राहणार आहे. लसूण व्यापाऱ्यांनीच ही माहिती दिली आहे.यंदा लसणाने कांद्यालाही घाम फुटेल इतका दर काढला असून त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे. मागील काही महिन्यांपासून सातत्याने लसणाच्या किंमतीने सातत्याने झेप घेत आता थेट 600 रुपयांची मजल गाठली आहे.घाऊक बाजारामध्ये लसूण प्रतिकिलो 300 ते 400 रुपये दराने विकत मिळत आहे. तर किरकोळ बाजारपेठेमध्ये लसणाच्या दरांनी 500 ते 600 रुपये प्रतिकिलोचे दर गाठले आहेत.
गेल्या वर्षी पावसामुळे शेतमाल खराब झाला. तेव्हापासून लसणाचे दर वाढू लागले आणि ते चढतेच राहिले. गेल्या दीड वर्षापासून लसणाचे दर चढेच असल्याचं दिसत आहे. बाजारामध्ये लसणाचा तुटवडा असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये