शाहरूखच्या शर्टलेस फोटोवर गौरी खानची कमेंट; म्हणाली, “देवा आता हा…”

मुंबई | Shahrukh Khan – बाॅलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या ब्रह्मास्त्रमधील त्याच्या कॅमिओमुळे चर्चेत आहे. दुसरीकडे तो त्याच्या बहुचर्चित पठाण चित्रपटाच्या शुटिंगमध्ये देखील व्यस्त आहे. मात्र, गेल्या तीन वर्षापासून त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही, त्यामुळे त्याचे चाहते आता त्याच्या आगामी चित्रपटांची वाट पाहत आहेत. या दरम्यान, शाहरूखने त्याचा एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे.
शाहरूख खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या ‘पठाण’लूकमध्ये दिसत आहे. तो या फोटोमध्ये शर्टलेस बसला आहे आणि त्याचे सिक्स पॅक दाखवत आहे. शाहरुखचा हा फोटो पाहून चाहते त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये आता शाहरूखची पत्नी गौरी खाननं (Gauri Khan) देखील त्याच्या फोटोवर कमेंट केली आहे. तसंच तिची ही कमेंट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
शाहरुखने फोटो शेअर करताना मी माझ्या शर्टाशी बोलताना – ‘तुम होती तो कैसा होता….तुम इस बात पे हैरान होती…तुम इस बात पे कितनी हसती…….तुम होती तो ऐसा होता..’ मी सुद्धा पठाणची वाट पाहतोय, असं कॅप्शन दिलं होतं. त्याच्या या कॅप्शनवर गौरीनं कमेंट केली आहे. “देवा आता हा त्याच्या शर्टाशी पण बोलू लागला”, अशी कमेंट गौरीनं केली आहे.
