ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

गौतमी पाटीलने माझी फसवणूक केली! सोलापूरात तरुणाची पोलिसांत तक्रार; गौतमीच्या अडचणीत वाढ

सोलापूर : (Gautami Patil against Police complaint) मागील दिवसांपासून राज्यातील अनेक तरुणांच्या मनावर आपल्या नृत्य कलेच्या बळावर अधिराज्य करणार प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील सध्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण तिच्याकडून एका व्यक्तीची फसवणूक केली असल्याचा आरोप करत बार्शी येथिल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी केलेल्या या तक्रारीत गोतमीने ठरलेल्या मानधनापेक्षा अधिक पैसे घेतले. शिवाय कार्यक्रमाला उशीरा येवून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर परवानगी न घेता गौतमीचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल राजेंद्र गायकवाड यांच्यावर यापुर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

12 मे रोजी गौतमीची लावणी महोत्सव कार्यक्रम बार्शी येथे आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात गौतमी पाटील केतन मारणे आणि गौतमीचा सेक्रटरी विनोद या तिघांनी मिळून बार्शीकरांची फसवणूक केली म्हणून तशी तक्रार राजेंद्र गायकवाड यांनी बार्शी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये