ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

‘लावणी क्वीन गौतमी पाटील’ रुपेरी पडद्यावर झळकणार; परदेशात सिनेमाचं शूटिंग

सोलापूर : (Gautami Patil’s Ghungru Marathi movie is coming) गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव मागील काही दिवसांपासून सोशल माध्यमांमध्ये चर्चेत येताना दिसत आहे. कधी वादग्रस्त कारणांमुळे तर सिनेमात झळकणार आहे. ‘घुंगरु’ असे तिच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.

गौतमीच्या ‘घुंगरु’ या सिनेमाचं शूटिंग सोलापूर (Solapur), माढा (Madha), हंपीसह (Hampi) परदेशात झालं आहे. या सिनेमात गौतमी पाटील (Gautami Patil Movie) नक्की कोणती भूमिका साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही.

गौतमी आणि बाबा गायकवाड यांच्यासह ‘घुंगरु’ या सिनेमात सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते हे कलाकारदेखील झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा सिनेमाचं कथानक कलावंत आणि लोककलावंतांच्या आयुष्यावर भाष्य करणारं असू शकतं. ‘घुंगरु’ या सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा बाबा गायकवाड यांनी सांभाळली आहे.

एका व्हायरल व्हिडीओमुळे गौतमी पाटील रातोरात प्रसिद्धीझोतात आली होती. पण गेल्या काही दिवसांपासून ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत असला तरी तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये