कपडे काढून तपासणी घेतल्याने तरुणीची आत्महत्या!
कर्नाटक | शाळेच्या आवारातून दोन हजार रुपये गेल्यानं चार अल्पवयीन मुलींची तपासणी करण्यात आल्याचे प्रकरण कर्नाटकात घडले. शिक्षिकेच्या पर्समधून दोन हजार रुपये चोरीला गेल्याने विद्यार्थिनींची कपडे काढून तपासणी करण्यात आली. हा ताण सहन झाल्याने अल्पवयीन मुलीने आयुष्य संपवलं आहे. या मुलींना जवळच्या मंदिरात नेण्यात आलं आणि त्याआधी कपडे काढून त्यांची तपासणी करण्यात आली होती. हा ताण सहन न झाल्याने एका मुलीने आयुष्य संपवलं.
कुटुंबीयांनी काय सांगितलं?
मृत मुलीची मोठी बहिण सुद्धा याच शाळेत शिकते. तिने तिच्या आई-वडिलांना शाळेत काय घडलं? त्या बद्दल सांगितलं. बागलकोटचे एसपी अमरनाथ रेड्डी यांनी ही माहिती दिली. जीवन संपवून घेणारी मुलगी खूप संवेदनशील होती. दोन दिवसापासून ती कोणाशी काही बोलत नव्हती, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं. मुलीचा ज्या परिस्थितीत मृत्यू झाला, ते समजल्यानंतर पोलिसांनी स्वत:हून पुढाकार घेऊन तपास सुरु केला.
पोलिसांनी काय म्हटलं आहे?
बागलकोटचे पोलीस अधीक्षक अमरनाथ रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली. ज्या मुलीने आयुष्य संपवलं तिची मोठी बहीणही याच शाळेत जाते. शनिवारी शाळेत काय घडलं? तो प्रकार तिने आई वडिलांना सांगितला. या मुलीच्या आई वडिलांनी सांगितलं की आमची मुलगी खूपच संवेदनशील होती. दोन दिवसांपासून ती कुणाशीही काही बोलत नव्हती. तिने तिचं आयुष्य संपवलं आहे. या मुलीच्या मृत्यूनंतर आता पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.