“मला CBI द्या, दोन तासात मोदी, अदानींना अटक करतो”, आपच्या खासदाराचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली | Sanjay Singh – दिल्लीतील आम आदमी पक्षाचे (AAP) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना मद्य घोटाळ्याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर दिल्लीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सीबीआयने 8 तासांच्या चौकशीनंतर मनीष सिसोदियांना अटक केली आहे. त्यानंतर भाजप (BJP) आणि आपमधील संघर्ष वाढला आहे. अशातच, आपचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
खासदार संजय सिंह म्हणाले की, “मनीष सिसोदिया यांना अटक करणे हा मोदी सरकारचा भ्याडपणाचा परिचय आहे. मला सीबीआय (CBI) द्या, 2 तासात मोदी आणि अदानींना अटक करतो”
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. आपल्यासोबत ईडी आणि सीबीआय असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना दोन तासांत अटक करू, असा दावा संजय सिंह यांनी केला आहे.