इतरदेश - विदेशमहाराष्ट्र

भाविकांना गोदावरीत चांगले पाणी मिळणार का ?

गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात:

नाशिक: 

कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण काशी असलेल्या नाशिक शहरातही तयारी सुरू आहे. प्रयागराजला जावू न शकणारे भाविक गोदावरी नदीत स्नान करतील, पण ही दक्षिण काशीमधील गोदावरी पवित्र स्नानासाठी स्वच्छ आहे का? हा प्रश्न नाशिकरांसह महाराष्ट्रातील अनेकांना पडला आहे. गोदावरी स्वच्छ करण्यासाठी गेली अनेक वर्षे विविध मार्गांनी उपक्रम राबवले गेलेत. मात्र नाशिककरांच्या आस्थेचा भाग असलेला हा ‘गोदाकाठ’ दिवसेंदिवस प्रदुषित (River Polution) होत आहे.

गोदावरी नदीचा उगम पश्चिम घाटातील सहयाद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रह्मगिरी येथे झाला. पौराणिक कथेनुसार गौतम ऋषींनी गोहत्येचे प्रायश्चित म्हणून भगवान शंकराची तपश्चर्या केली. शंकरांनी प्रसन्न होऊन ब्रह्मगिरी पर्वतावर जटा आपटल्या आणि गोदावरी (Godavari) पृथ्वीवर अवतरली. असं मानलं जातं, अशा या नदी (River) चा श्वास गेली अनेक वर्षे कोंडला गेलाय. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये