पुणे

अर्थसंकल्पानंतर सोने ३ हजारांनी स्वस्त

पुण्यात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड

देशात गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली असून तब्बल ७३ हजारांपर्यंत सोनं पोहोचलं आहे. त्यामुळे, यंदाच्या बजेटमध्ये सोने स्वस्त होणार की महाग याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अखेर, देशाच्या अर्थमंत्र्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोनं-चांदीच्या दरातही मोठी कपात या बजेटमधील निर्णयामुळे झाली आहे.

पुणे आणि जळगावच्या सराफ बाजारात याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. कारण, सोने खरेदीसाठी दुकानात गर्दी केलेल्या महिला व ग्राहकांना २ तासांतच प्रति तोळा सोन्यामागे ३ हजार रुपयांचा फायदा झाला आहे. त्यामुळे, सोनं खरेदीसाठी आलेल्या या सर्वच ग्राहकांनी बजेटवर समाधान व्यक्त केलं असून. बजेट जाहीर होताच सोन्याचा दर जवळपास ३ हजारांनी कमी झाल्याचे समजते आहे.

देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोने-चांदीच्या दराबाबत खुशखबर मिळाली आहे. सरकारने सोने-चांदीच्या सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. याआधी सोने-चांदीचे सीमा शल्क १५ टक्के होते. आता यात कपात करून सीमा शुल्क थेट ६ टक्क्यांवर आणण्यात आले असून सरकारने सीमा शुल्क थेट अर्ध्यापर्यंत कमी केल्यामुळे सोन्याच्या दरात प्रचंड घट झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये