ताज्या बातम्यादेश - विदेश

तरुणांसाठी आनंदाची बातमी! संरक्षण मंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली | भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलांसाठी अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत भारताच्या तिन्ही सैन्यात चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे, ज्याला ‘टूर ऑफ ड्यूटी’ असं नाव देण्यात आलं आहे. दोन आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मादी यांना नौदल, लष्कर आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी आग्निपथ योजनेची माहिती दिली होती. तसंच लष्करी व्यवहार विभाग त्याची अंमलबजावणी करत आहे. चार वर्षांनंतर, या योजनेंतर्गत भरती झालेल्या ८० टक्के तरुणांची सेवा समाप्त केली जाणार आहे. उरलेल्या २० टक्के सैनिकांना तिन्ही सेना दलात काम करण्याची पुन्हा संधी मिळणार आहे.

“सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने आज ऐतिहासिक निर्णय घेऊन ‘अग्निपथ’ या परिवर्तनीय योजनेला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत भारतीय तरुणांना सशस्त्र सेवेत सामील होण्याची संधी दिली जाईल,” असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

भारतीय तरुणांना याद्वारे ‘अग्नवीर’ म्हणून सेवा करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे देशाची सुरक्षा मजबूत होईल आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असंही राजनाथ सिंह म्हणाले. देशातील प्रत्येक तरुणाचे आयुष्यात सैन्य भरतीचे स्वप्न असते. या अग्निपथ योजनेमुळे रोजगाराच्या संधी वाढणार असून तरुणांना इतर क्षेत्रात जाण्यासाठीही चांगली संधी मिळणार आहे.

दरम्यान, या योजनेची माहिती देताना लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले की, “या योजनेमुळे सैन्य दलांमध्ये युवाशक्ती असेल. यामुळे फिटनेसची पातळी आणखी सुधारेल. सध्या भारतीय सशस्त्र दलाचे सरासरी वय ३२ वर्षे आहे. ही योजना लागू झाल्यानंतर ही योजना २४ ते २६ वर्षांची असेल. एवढेच नाही तर लष्कराला उच्च कौशल्य संसाधनेही मिळू शकतील. अग्निवीरांसाठी चांगले पे-पॅकेज उपलब्ध असेल. याशिवाय बाहेर पडताना चांगली रक्कम दिली जाईल.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये