Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

“सत्ता गेल्याचं ‘सुतक’ अजूनही पाटलांच्या चेहऱ्यावर”

मुंबई – Gopichand Padalkar on Jayant Patil – महाविकास आघाडी सरकार कोसळल्याचं सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर दिसत असून शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो. अशी भावना जयंत पाटलांची आहे, असा टोला भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना लगावला आहे.

वाळवा येथे क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने शुक्रवारी आयोजित समारंभात आमदार पडळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील उपस्थित होते.

दरम्यान, आज भाचा सोडला तर जयंत पाटील यांच्या मागे कुणीही नाही अशी टीकाही त्यांनी केली. जिल्हा बँकेत प्रचंड भष्टाचार झाला आहे. नोकर भरतीत देखील प्रचंड भष्टाचार झाला आहे. त्यामुळे बँकेवर प्रशासक नियुक्तीची मागणी आम्ही मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे, असं पडळकरांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये