ताज्या बातम्यादेश - विदेश

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजीनामा देणार… पहा प्रसिद्धीपत्रकात काय लिहिले आहे

दिल्ली | महाराष्ट्राच्या राजकारणात आता एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चिन्ह दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत त्यांनी यासंदर्भातील इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे. मुंबई भेटीत त्यांनी पंतप्रधांनांना आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून आज दिली आहे.

राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात काय लिहिले आहे ?

“महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही.

माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये