ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यपाल नियुक्त ७ विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ

गेल्या काही वर्षांपासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीसाठी १२ आमदारांच्या नियुक्तीला मुहूर्त काही मिळत नव्हता. अखेर आज विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्यापूर्वी महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल नियुक्ती आमदारकीसाठी १२ पैकी ७ नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज मंगळवारी दुपारी १२ वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या विधानपरिषद सदस्यांना शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यात चित्रा वाघ (भाजप) विक्रांत पाटील (भाजप) बाबूसिंग महाराज राठोड (भाजप) मनीषा कायंदे (शिंदे गट) हेमंत पाटील (शिंदे गट) पंकज भुजबळ (अजित पवार गट) इद्रिस नायकवडी (अजित पवार गट) यांनी आमदारकीची शपथ घेतली. उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला

‘या’ सदस्यांनी घेतली शपथ

भाजप : १) श्रीमती चित्रा किशोर वाघ २) श्री विक्रांत पाटील ३) श्री धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड

राष्ट्रवादी अजित पवार गट : ४) श्री पंकज छगन भुजबळ ५) श्री इद्रिस इलियास नाईकवाडी

शिंदे गट : ६) श्री हेमंत पाटील ७) डॉ श्रीमती मनीषा कायंदे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये