ताज्या बातम्यादेश - विदेश

जो बायडन यांचं स्वागत केलेली ‘ती’ चिमुकली आहे तरी कोण? जाणून घ्या

G20 Summit 2023 | आज (9 सप्टेंबर) G20 परिषदेसाठी (G20 Summit) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) भारतात आले. ते दिल्लीतील विमानतळावर आल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी जो बायडन यांचं स्वागत करण्यासाठी विमानतळावर एका लहान चिमुकली उपस्थित होती. बायडन यांचं स्वागत करणाऱ्या या लहान मुलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर बायडन यांचं स्वागत करणारी ही मुगली आहे तरी कोण? असा प्रश्न बहुतेक लोकांना पडला असेल. तर आता आपण या मुलीबाबत जाणून घेणार आहोत.

जो बायडन यांचं विमानतळावर स्वागत करणाऱ्या मुलीचं नाव आहे माया. माया ही अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांची मुलगी आहे. ती गार्सेंटीसोबत नेहमी मोठ्या कार्यक्रमांमध्ये त्यांच्यासोबत असते. ती अमेरिकेतही निवडणूक रॅलीत आणि मतदान केंद्रावर बऱ्याचदा दिसली आहे. तसंच गार्सेटी हे अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून शपथ घेत होते त्यावेळी तिथे माया हातात बायबल घेऊन उभी होती. त्यावेळीचाही तिचा फोटो व्हायरल झाला होता.

माया हिब्रू बायबल हातात धरून उभी होती त्यावेळीचा तिचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. गार्सेटी यांनी शपथ घेताना मायानं धरलेल्या बायबलवरच शपथ घेतली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये