ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

इंदुरीकर महाराजांच्या सासूबाईही ‘सरपंच’

संगमनेर | Gram Panchayat Election Result 2022 – 18 डिसेंबरला राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. तसंच आज (20 डिसेंबर) या ग्रामपंचायतींचा निकाल आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्या सासूबाई सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.

इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार (Shashikala Pawar) या अपक्ष उमेदवारी दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या दुरंगी लढतीत शशिकला पवार विजयी झाल्या आहेत.

शशिकला पवार या इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई (Indurikar Maharaj Mother in Law) आहेत. शशिकला पवार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुशीला उत्तम पवार यांच्यावर 227 मतांनी दारून विजय मिळवला आहे. शशिकला यांनी नारळ या चिन्हावर निवडणूक लढवत त्या निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंच बनल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये