सांगली | Gram Panchayat Election Result 2022 – सांगलीतील आटपाडी तालुक्यात भाजपनं गुलाल उधळला आहे. आटपाडी तालुक्यातील (Atpadi Taluka) पडळकरवाडीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांची एकतर्फी सत्ता आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला चांगलाच दणका बसला आहे. सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर (Hirabai Padalkar) ह्या सरपंचपदी विजयी झाल्या आहेत.
आटपाडीतील पडळकरवाडी ग्रामपंचायतमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंच पदासाठी निवडणूक लढवत होत्या. तसंच या निवडणुकीत हिराबाई कुंडलिक पडळकर यांचा विजय झाला आहे. सरपंच पदी हिराबाई पडळकर या तीनशे मतांनी निवडून आल्या आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पडळकरवाडी ग्रामपंचायतीवरही एकहाती सत्ता आलीये.
दरम्यान, गोपीचंद पडळकर हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. ते भाजपचे स्टार प्रचारक देखील आहेत. त्यांचे बंधू ब्रह्मनंद पडळकर हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. तसंच आता पडळकरवाडी गावामध्ये सरपंच म्हणून त्यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर विजयी झाल्या आहेत.
View Comments (0)