पिंपरी चिंचवडमध्ये प्रदुषणाचा कहर; हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरात ‘ग्रॅप’ प्रकल्पाची सुरुवात

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ (GRAP) प्रकल्पाची सुरुवात केली आहे. याप्रकल्पामध्ये शहराची हवेची गुणवत्ता पद्धतशीरपणे सुधारली आहे याची खात्री करण्यासाठी वास्तविक वेळेमध्ये निरिक्षण प्रणाली, अत्याधुनिक अंदाज आणि तात्काळ अंमलबजावणी यांचा समावेश आहे. सदर प्रकल्पासाठी ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (C-DAC) द्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ग्रॅप (GRAP) उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून महानगरपालिकेने हवेच्या गुणवत्तेच्या आव्हानांचा अंदाज, निरीक्षण आणि सक्रियपणे कृती करण्यासाठी महत्वाचे धोरण तयार केले आहे.
यासोबतच, महानगरपालिकेने नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (NCAP) च्या अंतर्गत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महापालिका हद्दीमध्ये हवा शुद्धीकरण प्रणाली, धुके घालविणारी उपकरणे, रस्ता साफसफाई करणारी उपकरणे (रोड वॉशर) आणि पिचकारी आधारित पाण्याचे फवारे असणारी प्रणाली अशा विविध बाबींच्या माध्यमातून हवा प्रदुषित होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
ग्रॅप प्रणालीच्या दोन, तीन व चार या टप्प्यांतर्गत सुधारित हवेच्या गुणवत्तेचा अंदाज हे सी-डॅक (C-DAC) च्या ‘निर्णय समर्थन प्रणाली’ नुसार हवेच्या गुणवत्तेच्या अंदाजांवर तीन दिवस अगोदर सुरू केले जातील. सुचविण्यात आलेले उपाय किमान १५ दिवसांसाठी किंवा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) मध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येईपर्यंत लागू करण्यात येतील. महानगरपालिका सी-डॅकच्या अंदाजानुसार, शहराच्या सर्व भागामधील पीएम २.५, पीएम १०, एनओ एक्स, एसओ एक्स सारख्या प्रदूषकांवर लक्ष केंद्रित करणार आहे. वाहनांच्या प्रदूषणाची कठोर देखरेख ठेवण्यासाठी महत्वाची यंत्रणा निर्माण केली आहे.