पुण्याचं पालकमंत्रीपद अजित दादांकडे तर अमरावती चंद्रकांत पाटलांकडे… राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर
पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट सोबत घेऊन शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी पुणे जिल्ह्यात आपले लक्ष अधिक केंद्रित केले. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री होण्याची सुप्त इच्छा बाळगून असलेले अजित पवार यांना खाजगीत पुण्याचे ‘सुपर पालकमंत्री’ बोलण्यास सुरूवात झाली होती. अशातच आता राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
सुधारित 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे
पुणे – अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
अमरावती – चंद्रकांत पाटील
सोलापूर – चंद्रकांत पाटील
भंडारा – विजयकुमार गावित
बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
बीड – धनंजय मुंडे
परभणी – संजय बनसोडे
नंदूरबार – अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार