ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

गुजरात निवडणुकांंचं बिगुल वाजलं, ‘आप’चं आव्हान भाजप पेलणार?

नवी दिल्ली : (Gujarat Assembly Elections Announced) आज (गुरुवार दि. 01 रोजी) केंद्रीय निवडणुक आयोगानं गुजरात विधानसभेच्या निवडणुका जाहिर केल्या आहेत. त्यामुळे आता गुजरातमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. दरम्यान आयोगाच्या माहितीनुसार, 1 आणि 5 डिसेंबर रोजी अशा दोन टप्प्यात निवडणुकांचा कार्यक्रमात पार पडणार आहे. मात्र, हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीबरोबरच गुजरात विधानसभा निवडणुकीची 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

पंजाबपाठोपाठ गुजरात काबीज करण्यासाठी यंदा आम आदमी पार्टीनं कंबर कसली आहे. पंजाबमध्ये एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर आता गुजरातमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आप प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरात निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच आपनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आपनं आतापर्यंत तब्बल 108 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. सध्या निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करणारा आप हा एकमेव पक्ष आहे. 

2017 ला काँग्रेस आणि भाजपमध्ये गुजरातची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. मात्र, या चुरशीच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं होतं. यावेळी भाजपनं 99 जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसनं 80 जागांवर सत्ता काबीज केली होती. पण निकालाअंती भाजप आणि काँग्रेस यांच्या जागांमध्ये केवळ 19 जागांचा फरक होता. बहुमत भाजपला मिळालं असलं तरी काँग्रेसनं भाजपला कडवी झुंज दिली होती. मात्र, काँग्रेस आता बॅकफुटवर पडली असल्याचे दिसून येत आहे तर त्यांची जागा ‘आप’नं घेतली आहे. त्यामुळं ‘आप’चं आव्हान काँग्रेस भाजप पेलणार का? असा सवाल या निवडणुकांच्या निमित्तानं समोर येताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये