गुजरात विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर; हार्दिक पटेल नाराज म्हणाले…

गांधीनगर : या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस पक्षातील नाराजीनाट्य चव्हाट्यावर येऊ लागली आहेत. पाटीदार समाजाचे नेते आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दीक पटेल यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधत घरचा आहेर दिला आहे. काँग्रेसकडून त्यांची अवहेलना केली जात आहे. हा माझा नाही तर, संपुर्ण पाटीदार समाजाचा अपमान केला आसल्याचा आरोप केला आहे. गुजरात काँग्रेसमध्ये माझी अवस्था लग्नानंतर नसबंदी केलेल्या नवऱ्यासारखी आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
26 व्या वर्षी प्रदेश काँग्रेसचा सर्वात तरुण अध्यक्ष बनलेल्या हार्दिक यांनी काँग्रेसमध्ये निर्णयक्षमतेचा अभाव असल्याचा आरोप केला. केंद्रात आणि राज्यात अधिक नेत्यांची उपस्थिती असल्याने निर्णय घेता येत नाही, असं ते म्हणाले. पाटीदार नेते नरेश पटेल यांना काँग्रेसमध्ये समाविष्ट करण्यास झालेल्या दिरंगाईवर हार्दिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये दररोज मीडियामध्ये येतात, त्यामुळे संपूर्ण पाटीदार समाजाचा अपमान होत आहे. हे पाटीदार समाज सहन करणार नाही, असं हार्दिक म्हणाले.