ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

गुलाबराव पाटील बेपत्ता? शिवसेनेकडून पोलिसात तक्रार, शोधणाऱ्यास मिळणार ‘हे’ मोठं बक्षीस

बुलढाणा | Gulabrao Patil – शिवसेनेनं (Shivsena) पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तसंच गुलाबराव पाटलांना शोधणाऱ्यास अकराशे रूपयांचं बक्षीस देण्याचंही जाहीर करण्यात आलं आहे.

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुराने थैमान घातले आहे. अशी बिकट परिस्थीती निर्माण झाली असतानाही पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यात फिरकलेच नाहीयेत. त्यामुळे शिवसेनेनं थेट पोलिसांत गुलाबराव पाटील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. पाटलांना शोधणाऱ्यास अकराशे रूपयांचं बक्षीसही जाहीर केलं आहे.

पावसाने जळगाव जामोद तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेकांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. अनेकांच्या घरातील साहित्यही वाहून गेलं आहे. इतकी वाईट परिस्थीती जिल्ह्यावर आली असतानाही गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्याला साधी भेटही दिलेली नाहीये. त्यामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये