Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“आय लव्ह यू म्हणायचं अन्…”; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं विधान चर्चेत!

सांगली – Gulabrao Patil on I love U | राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्येही ‘हमरी तुमरी’ पाहायला मिळाली. यावर बोलताना ठाकरे सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्कि टोलेबाजी केली.

तीन पक्षांचं सरकार आहे त्यामुळे तुम हमारी खेचो, हम तुम्हारे खेचेंगे, चालणारच आहे. कारण प्रत्येकजण आपल्या पक्षाचा विचार करतो आणि माझं ते कर्तव्यही आहे. सेना-भाजपची ज्यावेळी युती होती त्यावेळी तिथंसुद्धा अशा प्रकारे खेचाखेची व्हायची, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, आय लव्ह यू” म्हणायचं, नंतर लफडी करायची, हे चालतंच आहे. मी डब्बा आहे आणि उध्दव ठाकरे इंजिन आहेत, त्यामुळे ते जिकडे नेतील मी तिकडे जाणार असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये