ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

“आम्ही बंड केलेला नाही तर…”, गुलाबराव पाटील आक्रमक

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. नव्याने स्थापन झालेल्या सरकारने सभागृहात बहुमत सिद्ध केलं आहे. त्यामुळे नव्या सरकारवर शिक्कामोर्तब झालं आहे. नव्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर एकनाथ शिंदे गटाकडून माजीमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषण केलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला.

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, आम्ही बंड केलेला नाही, उठाव केला आहे. आम्हाला बंडखोर म्हणून नका. आज माझ्या सारख्या माणसाला म्हणतात गुलाबराव तुम्हाला टपरीवर पाठवीन, रिक्षा चालवणारा, चहा विकणारा ज्यांना काही काम नव्हतं त्यांना नेता केलं असं म्हणत आमची खिल्ली उडवली. अजितदादा म्हणतात, शिवसेना सोडून जातात ते पुन्हा निवडून येत नाही. पण दादा आम्ही शिवसेना सोडली नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, असं सल्ला गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

तसेच आमचा साधा मेंबर फुटला तरी आम्ही विचार करतो. इथं चाळीस आमदार फुटले तरी जाग आली नाही. आम्हाला साहेबांची भेट मिळत नव्हती, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली. आधीच्या सरकारमध्ये आम्हाला उद्धव ठाकरे यांची भेट मिळत नव्हती. आमचे फोन घेतले जात नव्हते. त्याचवेळी एकनाथ शिंदे विचारायचे कोरोना काळात तुम्हाला किट वाटप करायच का, काय मदत हवी, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या कामाच्या पद्धतीचा उल्लेख केला.

आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात किती दौरे केले, हे तपासा असंही पाटील म्हणाले. शिवसेनेतून नारायण राणे, भुजबळ, राज ठाकरे गेले तेव्हा उठाव झाला, मग आता काय झालं? आम्ही सत्तेतून बाहेर जातो तरी बंडखोर आहे म्हणता. तुम्ही आम्हाला पुन्हा मातोश्रीवर या सांगायला हवं होतं. मात्र निवडून येण्याची लायकी नसणारे आम्हाला बोलतात, अशी टीका देखील गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये