ताज्या बातम्या

ऐन दिवाळीत गुणरत्न सदावर्तेंकडून एसटी बंदचा इशारा

मुंबई | दिवाळीच्या (Diwali 2023) तोंडावर संप करून प्रवाशांना वेठीस धरायचे आणि महामंडळात वर्चस्व सिद्ध करायचे, असा कामगार संघटनेचा पायंडा एसटी महामंडळात (ST Mahamandal) रुजत आहे. यात आता गुणरत्ने सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाची भर पडली आहे. मात्र गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी आज दिलेल्या एसटी बंदच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता मात्र हा दावाही फोल ठरताना दिसतोय. राज्यभरातील एसटी वाहतूक सुरु आहे. वर्धा विभागातील सकाळच्या सत्रात 100 टक्के वाहतूक सुरु आगे कोल्हापुरातही सकाळच्या सत्रातील एसटी (ST Bus) सुरु आहेत. माजलगाव आगारातही एसटी बसेस सुरु आहेत. त्यासोबतच ठाणे,पाटोदा,दिग्रस,हिंगोली,आणि कळंब आगारातील एसटी बससेवा 100 टक्के सुरु आहे.

एसटी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी सर्वसमावेश समिती स्थापन करावी, महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी आणि राज्यातील 85 टक्के एसटी वाहनांचा विमा काढलेला नसल्याने एसटी गाड्यांचा विमा काढावा यासाठी सोमवारपासून राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे, असे कष्टकरी जनसंघाच्या वतीने सदावर्ते यांनी सांगितले.

आज चर्चेची शक्यता

सदावर्ते यांच्या इशाऱ्यानंतर महामंडळाने पत्रातून भूमिका मांडली. महामंडळाने चुकीचे मुद्दे मांडले असून सरकारसोबत चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, असे सदावर्तेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात चक्का जाम आंदोलन मागे घेण्यासह मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आज, सोमवारी मंत्री उदय सामंत चर्चा करणार आहेत, अशी शक्यता वरिष्ठ एसटी अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये