पटोलेंना धक्का! प्रदेशाध्यक्ष पद जाणार? काँग्रेस नेतृत्त्वाकडून खांदेपालट करण्याची चाचपणी

मुंबई : (H.K. Patil Tours In Maharashtra) मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलानंतर आता लवकरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच पार्श्वभुमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डच्चू देवून नव्या प्रदेशाध्यांची चाचपणी करण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अनेक नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील आठवड्यात मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांना नारळ दाखवत वर्षा गायकवाड यांच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ टाकण्यात आली आहे. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे राज्यभर वाहत आहेत. त्यामुळे नाना पटोले यांना लककरचं डच्चू देण्यात येणार असल्याचे निश्चित मानलं जात आहे.
या पार्श्वभुमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील हे दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते राज्यातील मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. एच.के. पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेला बळ मिळालं आहे.