अग्रलेखराष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

सवय…

अरुणा टोप

लहान मुलांना सवयी लावताना आपली पण पहिल्यापासून सुरुवात असते, काय? बरोबर आहे ना? बघा, प्रत्येक जण रमला बालपणाची मस्ती, खोड्या आठवण्यात. थोडे मोठे झाल्यावर अर्थातच ह्या सगळ्यांचे महत्त्व कळायला लागले म्हणा. आजही शुभंकरोती म्हटल्यावर पाढे, श्लोक ओळीतच म्हटले जातात. सवयीचा परिणाम.

किती रोजच्या वापरातला, अगदी नित्य परिचयाचा शब्द. पण ह्याला बदलवण्याचा प्रयत्न जो करतो ना तोच समजू शकेल किती अवघड टास्क आहे हे करणे. लहान मुलांना सवयी लावताना आपली पण पहिल्यापासून सुरुवात असते, काय? बरोबर आहे ना? रोज होमवर्क करायचाच हं (आपली अळमटळम आठवते ना! रोज पाढे म्हणायचेच हा नियम तेव्हा आवडत होता?) बघा प्रत्येक जण रमला बालपणाची मस्ती, खोड्या आठवण्यात. थोडे मोठे झाल्यावर अर्थातच ह्या सगळ्यांचे महत्त्व कळायला लागले म्हणा.
आजही शुभंकरोती म्हटल्यावर पाढे, श्लोक ओळीतच म्हटले जातात. सवयीचा परिणाम, दुसरं काय! बरं ह्या सवयी पण कधी-कधी मजेदार असतात हं. कुणाला झोपेत घोरायची सवय, तर कुणाला जेवण झाल्यावर जोरात ढेकर द्यायची सवय, कुणी सतत कार्यमग्न, तर कुणी गप्पांमध्ये रममाण, पण ही सवय सुटायला कधी कधी खूप काही घडत असतं हं. आम्ही मैत्रिणी रोज संध्याकाळी मासिकं, पुस्तक बदलायला जायचो, तीन-चार वाचनालये होती आम्हा सगळ्यांची, जाताना दिवसभराच्या गप्पा, गमती-जमती करत, जात असू. माझी अशीच एक सवय होती समोरून येणार्‍या ग्रुपवरच जे वाक्य कानावर आलं की त्यावर प्रत्युत्तर द्यायचं! आणि पुढे जायचं. हे चूक होतं, अगदी मान्य, पण आदत से मजबूर
दुसरं काय.

पण एकदा चांगली अद्दल घडली अन् सुटली ती सवय. त्याचं असं झालं होतं, आम्ही सगळ्या मैत्रिणी बहुतेक कल्याणहून ठाण्याला जायला निघालो होतो, त्या दिवशी चक्क सगळ्या आरामात बसलो होतो विंंडो सीटसहित. गप्पा सुरू झाल्या आणि घात झाला ना!

माझ्यासमोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या बोलण्यावर मी माझी एक्सपर्ट कॉमेंट केली. सवयीनुसार पण आज ती व्यक्ती मला ओलांडून पुढे नव्हती गेली ना! मला चूक लक्षात आली, आपण पायी चालत नसून ट्रेनमध्येच बसलो आहोत. नंतर सॉरी म्हणताना तोंड अक्षरशः बघण्यासारखं झालं होतं. त्यानंतर ही सवय कायमचीच सुटली बरं का! असो, अनेक सवयी सुटत जातात हळूहळू. आईकडे असताना वाफाळता चहा पिण्याची सवय पुढे अशीच, एकामागे एक कामं करता-करता सुटली. आता गरम चहा समोर असला तरी पिणं जमत नाही.

कालाय तस्मै नमः दुसरं काय? बघा, पण ही गप्पा मारायची सवय मात्र अजून टिकून आहे हं. माझा चुलतभाऊ नेहमी म्हणायचा दिवसभर बरोबरच असता, तुम्ही सगळ्या तरी पाच मिनिटं थांब पाच मिनिटं थांब काही संपत नाही तुमचं, काय बडबड करता एवढी समजत नाही. त्याला काय सांगायचं हाच तर आमच्या मैत्रीचा ऑक्सिजन आहे. त्याच्याशिवाय, स्मॅस ग्रुप कोमेजून जाईल.
एकवेळ जेवलं नाही तरी चालेल, पण मैत्रिणींशी बोलणं अत्यावश्यक. बघा थेट बालपणापासून फिरवून आणलं तुम्हा सगळ्यांना हो ना? मजा आली मला, तुमचं काय? तुम्हीही लिहा तुमच्या सवयी, आवडी-निवडींबाबत, अशीच मैफल भरवूया पुनः कधीतरी, थांबवते आता.

Related Articles

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये